पर्यवेक्षक विठ्ठल कराळे यांचे निधन
कराड, दि. 26 (प्रतिनिधी) : कुसूर, ता. कराड येथील रहिवाशी व तळमावले येथील वाल्मिकी विद्यालयाचे पर्यवेक्षक विठ्ठल लक्ष्मण कराळे (वय 56 वर्षे) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन असा परिवार आहे. माध्यमिक शिक्षक मोहन कराळे यांचे ते बंधू होत. विठ्ठल कराळे यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत उल्लेखनीय सेवा बजावली. वाल्मिकी विद्यालयात अनेक नाविण्यपुर्ण उपक्रम राबवण्यात त्यांचा महत्वपुर्ण सहभाग होता. त्यांनी आरएसपीचे तालुका समादेशक म्हणून काम पाहिले होते. आपल्या ज्ञानदानाच्या सेवेबरोबरच त्यांनी अनेक नामवंत खेळाडू निर्माण केले. विविध क्रीडा स्पर्धांसाठी त्यांनी पाठबळ दिल्याने क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवत अनेक खेळाडूंना शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने त्यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने गौरवले होते. त्यांच्याबरोबर शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले होते. कोळेच्या घाडगेनाथ पतसंस्थेच्या सल्लागार समितीत ही त्यांनी काम केले होते.