Breaking News

वसतीगृहात विद्यार्थिनींच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ;विद्यार्थिनींची तहसीलदारांकडे तक्रार;


जामखेड  
मागासवर्गीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना सडके अन्न व अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याची कैफियत तहसीलदार विशाल नाईकवडे मांडली असता, तहसीलदारांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. 
येथील शासकीय विद्यार्थिनींचे वसतीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण, विविध सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्रस्त झालेल्या, विद्यार्थिनींनी आपली कैफियत थेट तहसीलदार यांच्याकडे मांडली. तहसीलदार यांनी या वसतीगृहाला भेट दिली. वसतीगृहातील गरिब विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळणार्‍या या गंभीर प्रकरणाचा जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितले. 
येथील सदाफुले वस्ती परिसरात मागासवर्गीय विद्यार्थिनींचे शासकीय वसतिगृह आहे. मागील तीन वर्षांपासून या वसतीगृहात राहणार्‍या व वसतीगृहातील निकृष्ट दर्जाच्या अन्न-पाण्यास कंटाळलेल्या 
या विद्यार्थिनी दि. 28 रोजी चारच्या सुमारास तहसील कार्यालयात आल्या. त्यांनी तहसीलदार विशाल नाईकवडे यांची भेट घेवून वसतीगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण, अशुध्द पिण्याचे पाणी, सडके फळे मिळत असून, मासिक भत्ता यामध्ये अनियमितता आहे. कोणतीही स्टेशनरी भेटत नाही, गरम पाणी मिळत नाही, सांडपाण्याची व्यवस्था नाही, याबाबत वसतीगृह अधिक्षक व समाज कल्याण अधिकारी यांना अनेक वेळा निवेदन दिले. मात्र कोणीही लक्ष दिले नाही. आम्ही आजारी पडलो, आता तुम्हीच दखल घ्यावी, अशी विनंती करत विद्यार्थिनींना रडू कोसळले. तहसीलदार विशाल नाईकवडे यांच्याकडे विद्यार्थिनींनी तोंडी व निवेदनाद्वारे कैफीयत मांडली. या निवेदनावर प्रिया भंडारे, राणी खताळ, मनिषा चव्हाण, दिक्षा औसामल, सोनाली स्वामी, अश्‍विनी सुर्यवंशी, अश्‍विनी नागरगोजे, सोनाली चौभारे, अर्चना भागवत, ऋतुजा खाडे, पुजा पाचरणे, राधा साठे, पुजा गव्हाळे यासह  40 विद्यार्थिनींच्या सह्या आहेत. 
तहसीलदार विशाल नाईकवडे विद्यार्थिनींची कैफीयत ऐकूण गहिवरून गेले. त्यांनी तातडीने वसतीगृहाला भेट दिली, आणि या वस्तीगृहातील असुविधांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात येईल असे विद्यार्थिनींना सांगितले.


वसतीगृह अधिक्षक करूणा ढवन यांनी सांगितले की, जेवणाचा ठेका धुळे येथील सुनील ट्रेडर्स यांना देण्यात आला आहे, तो कधीच जामखेडला वसतीगृहात येत नाही, त्याने उपठेकेदार नेमलेला आहे, तो सर्व भाज्या तोच आणतो.


अधिकार्‍यांचा पांघरूण घालण्याचा प्रयत्न 
-विजय वाबळे, सहाय्यक आयुक्त अहमदनगर
सदर वसतीगृह आठ दिवसापूर्वी चालू झाले असून, सर्व सुविधा उपलब्ध आहेत. मासिक भत्ता शासनाकडून मिळतो