पारनेर येथे रमजान ईद साजरी
महिनाभराचे रमजानचे रोजे पुर्ण झाल्यानंतर आज पारनेर येथे रमजान ईद म्हणजेच ईल-ऊल- फित्र उत्साहात साजरी करण्यात आली.पारनेर येथील ईदगाह मैदान येथे डॉ. आर जी सय्यद यांच्या मार्गदर्शनात ईदची नमाज पठण केली. याप्रसंगी त्यांचे धार्मिक प्रवचन झाले. यात त्यांनी रमजान महिना, त्यातील सत्कर्म व आजचा मानव याची माहिती दिली. याप्रसंगी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याप्रसंगी पोलिसांकडून गुलाबपुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
