डेब्रीज प्रकरणाच्या निःपक्ष चौकशीसाठी नाना पवारांना रजेवर जाण्याचे आदेश रणजीत हांडे यांची डोकेदुखी आणखी वाढली
मंत्रालय डेब्रीज प्रकरणी दैनिक लोकमंथनने प्रसिध्द केलेल्या वृत्ताने परिणाम साधला असून या वृत्ताची गंभीर दखल घेऊन साबा अभियंतापदाचा पदभार स्वीकारण्यासाठी हजर झालेले नाना पवार यांना पदाची सुत्रे देण्यास नकार देऊन एक महिन्याच्या रजेवर जाण्यास सांगितले आहे. रजा काळ संपल्यानंतर पवार यांच्या बदलीचा आदेश नव्याने काढण्याचेही सुचित केले आहे. या संदर्भात डेब्रीज घोटाळ्याच्या चौकशी अहवाल सादर केल्यशिवाय चौकशी अधिकारी अधिक्षक अभियंता अरविंद सूर्यवंशी यांना कार्यमुक्त न करण्याचा निर्णय मंगळवारी साबा मंत्री आणि प्रधान सचिवांच्या बैठकीत झाल्याचे वृत्त लोकमंथनने बुधवारी प्रसिध्द केले होते. या वृत्ताने खळबळ उडाली असतानाच नाना पवार यांना रजेवर जाण्यास सांगण्यात आल्याने डेब्रीज प्रकरणी साबा मंत्री आणि नव्याने रुजू झालेले साबां सचिव गंभीर असल्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी या प्रकरणातील मुख्य संशयीत शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे याच्या मागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ठ आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या संदर्भात तपशील असा की रणजीत हांडे यांच्याकडे शहर इलाखा साबा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार असताना मंत्रालय इमारत परिसरातून नऊशे ट्रक डेब्रीज क ाढल्याचे कागदावर दाखवले गेले होते. या खेरीज एका दिवसात आठशे तीस मजूर कामाला लावणे, यासारखे विक्रम या काळात तत्कालीन कार्यकारी अभियंत्याच्या नावावर नोंदवले गेले आहेत. हा प्रकार जेवढा हास्यास्पद तेवढाच गंभीर असूनही साबा प्रशासन पातळीवर दुर्लक्षित करून भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न सुरू होता. तथापि आ. चरणभाऊ वाघमारे आणि लोकमंथनने केलेल्या पाठपुराव्यामुळे चौकशी क्रमप्राप्त ठरली. चौकशी अधिकारी अरविंद सूर्यवंशी यांची बदली करून चौकशीची दिशा बदलण्याचे शकुनी प्रयत्न हाणून पाडले.
(घटनाक्रम उद्याच्या अंकात)