Breaking News

आंतरजिल्हा बदली नियुक्ती गैरसोयीची; शिक्षकांचा आक्षेप

सोलापूर, दि. 20, जून - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्तीपासून राज्यभरातील इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणार्‍या सोलापूर जिल्ह्यातील 380 पैकी 296 शिक्षकांची आंतरजिल्हा बदली क रण्यात आली. पण, पती-पत्नी एकत्रिकरण, इतर अडचणींची दखल घेताच परस्पर देण्यात आलेल्या नियुक्ती आदेशामुळे बदली गैरसोय झाल्याची तक्रारी आंतरजिल्हा बदलीद्वारे आलेल्या शिक्षक ांनी केल्या. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी राबविण्याचे शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार नियुक्ती प्रक्रियेची मोहीम शिक्षण विभागतर्फे सुरू केली. आंतरजिल्हा बदलीसाठी आ ॅनलाइन अर्ज व नियुक्तीसाठीचा प्रस्ताव दाखल केलला. पण, बदली आदेश ज्या तालुक्यातील शिक्षक त्याच तालुक्यात किंवा लगतच्या तालुक्यात देण्याऐवजी गैरसोयीचे होईल, अशा ठिकाणी नियुक्ती मिळाल्याने आंतरजिल्हा बदलीद्वारे आलेले शिक्षक संतापले. इतर जिल्ह्यात आमच्या अडचणींची दखल होते. पण, स्वत:च्या जिल्ह्यात नियुक्ती आदेश गैरसोयीचे असल्याच्या तक्रारी अनेक ांनी केल्या. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड यांच्या दालनामध्ये शहरातील एका खासगी शाळेतील गायकवाड नावाच्या शिक्षकाने त्याच्या नियुक्ती प्रक्रियेवरून वादविवाद घालण्यात सुरवात केली. त्यावेळी शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात उपस्थित असणारे जिल्हा परिषद प्रा. सुभाष माने, नितीन नकाते यांनी संबंधित शिक्षकास तक्रारीचे कारण विचारले. त्या शिक्षकाने नकाते यांना उद्धट बोलल्याने सदस्य माने संतापले. त्यांनी गायकवाड यांची कानउघाडणी करीत थेट पोलिसांच्या ताब्यात देण्याची सूचना केली. त्या प्रकारामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.