कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत शेकाप, राष्ट्रवादीसह शिवसेनाही मैदानात
मुंबई - पालघर लोकसभेच्या पोटनिवडणूकीच्या संघर्षानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या येत्या 25 जून रोजी होणार्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये रसामना रंगणार आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपने राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देवून पक्षात प्रवेश केलेले निरंजन डावखरे यांना तर शिवसेनेने ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई, कोकण पदवीधर विभाग आणि मुंबई, नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी येत्या 25 जून रोजी मतदान होणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले कोकण पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार निरंजन डावखरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आत्तापर्यंत ज्या शिवसेनेने कोकणात डावखरे यांना अप्रत्यक्ष मदत करण्याची मैत्री निभावली, तीच शिवसेना डावखरे यांच्या भाजपमध्ये जाण्यामुळे आव्हान म्हणून समोर आली आहे. शिवसेनेने आज कोकण पदवीधर मतदारसंघात ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर केली आहे. सेनेच्या या उमेदवारीमुळे डावखरे यांना थेट आव्हान निर्माण झाले आहे. तर त्यात आणखी राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडणार आहे. राष्ट्रवादीकडूनही नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली जाणार असून मुल्ला यांचे नाव राष्ट ्रवादीकडून निश्चित झाले असल्याचे सांगण्यात आले. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ऐनवेळी मागे ठेवत शेतकरी कामगार पक्षही यात उडी मारण्याच्या तयारीत असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्यापूर्वी डावखरे यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर सेनेकडून तशी तयारी सुरू करण्यात आली आली होती. माजी सभापती वसंत डावखरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीच्या नात्याला त्यानंतरही कुठे तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार होती. मात्र, निरंजन डावखरे यांनी भाजपचा रस्ता पकडल्याने शिवसेना नाराज झाली आहे. त्यानंतर शिवसेनेने कोकणपदवीधरच्या रणागंणात उडी घेत थेट उमेदवार उभा केला आहे. कोकण पदवीधर मतदार संघात शिवसेनेने आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावण्याचा निर्धार केला असल्याने त्याचा फटका डावखरे यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण पदवीधर मतदार संघ आणि त्यासोबतच नाशिक शिक्षक, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघात 7 जूनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. तर 8 जूनला अर्जाची छाननी होईल आणि 11 जूनपर्यंत उमेदवाराला आपला अर्ज मागे घेता येणार आहे. 25 जून रोजी मतदान आणि 28 जून रोजी मतमोजणी होणार आहे.