शिक्षकाच्या प्रारब्धाला तात्यांचे आशीर्वाद, उत्पन्नाच्या बनावट दाखल्याने एका शेतकर्याचे अनुदान लाटून लाभार्थी केला बाद
नाशिक-विशेष प्रतिनिधी/
ज्ञानदानाचे काम करणार्या शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आदरार्थी असतो. मात्र अशा आदरयुक्त शिक्षकाने एखाद्या योजनेचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी चक्क उत्पन्नाचा दाखला बदलून दाखवलेल्या हातसफाईने शिक्षकी पेशाला अनुदानाच्या बाजारात मांडून काबाडकष्ट करणार्या शेतकर्यांच्या तोडचा घास पळवल्याचे उघड झाले आहे.
सिन्नर तालुक्यातील एका शिक्षकाने जवाहर रोजगार योजनेच्या विहिरीचे अनुदान लाटण्यासाठी केलेल्या या प्रकरणाची चर्चा आता शिक्षण विभागात सुरू झाली आहे. या प्रकरणी गुन्हा केव्हा दाखल होतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
या मुजोर शिक्षकाने केलेल्या या संतापजनक प्रकरणाची माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील अनुदानित माध्यमिक शाळेत असलेल्या शिक्षकाने जवाहर रोजगार योजनेतील विहिरीचे अनुदान लाटण्यासाठी आपला पगार न दाखवता शेतकरी असल्याचा व 18 हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला तयार करून विहिरीचे अनुदान लाटले. या प्रकरणात काही प्रमाणात मलीदा खाणारा कृषी अधिकारीही जबाबदार आहे. खर्या अर्थाने ज्या शेतकर्यांना या योजनेची गरज आहे त्याना योजनेचा लाभ न मिळता अशा पगारी शिक्षकाला लाभ देणारी यंत्रणा नेमकी काय काम करते. हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
वास्तविक या मास्तरांच्या पत्नी नाशिक येथील एका शासकीय कार्यालयात अधिकारी असल्याचे समजते. स्वतः माध्यमिक शिक्षक असताना एवढे धाडस दाखवून शासनाचा पगार घेणार्या शिक्षकाने शासनाचे अनुदान लाटावे? आणि अशा या धाडसाला शासकीय यंत्रणेतील अधिकार्यांनी साथ द्यावी या सारखे प्रारब्ध एखाद्याला शिक्षकाला प्राप्त व्हावे. हे विशेष. या प्रारब्धाच्या प्रक्रियेत पडलेले छिद्रे शोधून अनुदानाची चोरी शोधण्याचे आव्हान सरकारी यंत्रणेला असून संबंधित कुठली भुमिका घेतात यावर अनुदान लुटीचे प्रारब्ध अवलंबून आहे.