Breaking News

अंदमान निकोबारमध्ये होणार रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना - रामदास आठवले


मुंबई, दि. 10, जून - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा संपूर्ण देशभर पोहोचविण्याच्या मोहिमेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रचंड यश मिळाले आहे. अतिशय दुर्गम भाग असलेल्या ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्ष पोहोचविल्यानंतर आता उद्या रविवार 10 जून रोजी केंद्रशासित प्रदेश असणार्‍या अंदमान निकोबार या बेटावर रिपब्लिकन पक्षाच्या शाखेची स्थापना होणार आहे, अशी अधिकृत माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. अंदमान निकोबार येथील पोर्टब्लेयर या बंदरावर रिपब्लिकन पक्षाच्या शाखेचा स्थापना सोहळा रामदास आठवले यांच्याहस्ते आयोजित करण्यात आला आहे, असे रिपाइंतर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.