विखे परिवाराने जपला शिक्षणाचा वसा : भिंगारदिवे
लोणी प्रतिनिधी
समाजातील वंचित घटकांना आधार देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. देवदेवतांसाठी ओंजळभर देत असलेल्यांनी या वंचित घटकांसाठी मूठभर दिले तरी महापुरुषांच्या स्वप्नातील साक्षर भारत निर्मितीसाठी त्यांचे योगदान अमूल्य ठरणार आहे. विखे परिवाराने पूर्वीपासून जपलेला शिक्षणाचा वसा याचेच प्रतीक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते सागर भिंगारदिवे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील काळे विद्यालयात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल भोसले यांनी आयोजित केलेल्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुभाष माळी होते. याप्रसंगी प्रमुख पाहूणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय सेलचे तालुकाप्रमुख अक्षय भिंगारदिवे, प्राचार्य खर्डे, बाळकृष्ण भोसले, ग्रा. प. सदस्य शरद आरगडे, अमोल भोसले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कुल बँग, वह्या व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्याअभावी शिक्षणापासून वंचित रहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांना येथून पुढे मदतीचा हात देऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात ठेवण्याचा निर्धार निखिल भोसले यांनी याप्रसंगी केला. कार्यक्रमास पर्यवेक्षिका मंगल बंगाळ, मिनाक्षी पाळंदे, अक्षय भोसले, संजय शेळके, अमोल भोसले, विनोद भोसले आदी उपस्थित होते.