Breaking News

विधान भवनाला रंगरंगोटी नाही- भानुसे


नागपूर : नागपुरात होणा-या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान भवनाच्या इमारतीला रंगरंगोटी केली जाणार नाही. फक्त पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रुफ पेंडॉल्स उभारले जात असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एच. भानुसे यांनी केला यासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, अधिवेशनाची तयारी करतांना कोणत्याही इमारतीला रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. डिसेंबर 2017 मध्ये हिवाळी अधिवेशनासाठी इमारतींचे रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे पावसाळी अधिवेशनासाठी रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. असा खुलासा केला आहे. अधिवेशना दरम्यान नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्पुरत्या स्वरुपात वॉटरप्रूफ पेंडाल उभारण्यात येत आहे. यामध्ये पाणी धरु ठेवणाऱ्या कॅनव्हस तारपोलीन ऐवजी पावसाच्या पाण्याचा त्वरीत निचरा करणाऱ्या व कोरड्या राहणाऱ्या एचडीपीई तारपोलीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरते पेंडाल उत्तमप्रकारे वॉटरप्रूफ राहतील व शासनाचा आर्थिक फायदाही होईल. विधिमंडळाच्या डिसेंबर 2017 मधील हिवाळी अधिवेशनामध्ये इमारतींचे रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनाची तयारी करतांना इमारतीची सफाई, गळती बंद करणे, तात्पुरते वॉटरप्रूफ पेंडाल उभारणे, इमारतीच्या परिसरातील पावसाचे पाण्याचे जलनीस्तरण व्यवस्थाची सुधारणा तसेच दुरुस्ती करणे,अधिवेशनासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचा-यांच्या निवास व्यवस्थेसाठी केवळ आवश्यक साहित्याचा पुरवठा करणे अशीच कामे हाती घेण्यात आलेली आहे. सार्वजनिक विभागातर्फे अधिवेशनासाठी नमूद केलेली वस्तुस्थिती निरीक्षणाकरिता उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.