शिवसेनेचा पुन्हा स्वबळाचा नारा
मुंबई - आम्ही कुणाच्या जीवावर मोठे झालो नाही, राष्ट्रप्रेम, राष्ट्रसेवा हेच आमचे हित आहे. त्यामुळे जिंकल्याशिवाय शांत बसू नका, असे आवाहन करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेचा 52 वा वर्धापनदिन मंगळवारी साजरा झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
याआधी आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर सत्ता स्थापन करेल. तसेच दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना निर्माण करेल, असा आत्मविश्वास शिवसेनेने व्यक्त केला होता. त्याचाच पुनर्विचार आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला आहे. पालघरची पोटनिवडणूक बाकीचे चिटींग करुन जिंकले आहेत, अशी टीकाही यावेळी ठाकरे यांनी केली. मेहनतीला पर्याय नाही, आता सत्ता आणायची, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. जिथे सर्वच मेहनत घेत असल्याने आपण एवढे पुढे आलो आहे. सत्ता असो किंवा नसो आपण राष्ट्रप्रेम जपत आलो आहोत. त्यामुळे कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आपल्या पक्षाचे नाव आहे. अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू झाली पाहिजे, हा आदेश देणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते होते. आता शिवसेना महाराष्ट्रात नाही तर देशभरात न्यायची आहे. स्वबळाचा ठराव आपण मंजूर केला आहे. सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोणी करत नाही. शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करते. साहेबांचे एक वाक्य होते 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण पण आपण आता 150 टक्के समाजकारण आणि तितकेच टक्के राजकारण करत आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगतिले.