Breaking News

शिशिर शिंदेंची ’घरवापसी’

मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनसे एकीकडे नव्याने मोर्चेबांधणी करत आहे तर दुसरीकडे गळती सुरूच आहे. शिवसेनेतून मनसेत दाखल झालेले शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला. वयाच्या सतराव्या वर्षी शिवसेनेत दाखल झालो होतो तेव्हा एका हाती झेंडा आणि एका हातात धोंडा घेतला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली ती खूप भावनिक होती. उद्धव ठाकरेंचा हात हातात घेतला तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंचा भास झाला आता हातात भगवा झेंडा आणि दुसर्‍या हाता धोंडा घेऊन कामाला लागणार असा पवित्राच शिंदेंनी जाहीर केला.