Breaking News

बँक ऑफ महाराष्ट्राचे 5 अधिकारी अटकेत डीएसके फसवणूक प्रकरण : एका अभियत्यांलादेखील अटक


पुणे : डीएसके प्रकरणांने नवीन वळण घेतले असून, डीसकेला बेकायदेशीररित्या कर्ज देणार्‍या बँका आता पोलिसांच्या रडारवर असून, याप्रकरणी बुधवारी बँक ऑफ महाराष्ट्राचे पाच अधिकारी व एका मुख्य अभियंत्याला पोलिसांनी अटक केली. डीएसकेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक अनियमितता असल्याचं माहीत असूनही त्यांना बेक ायदेशीररित्या कर्ज देण्याचा ठपका या अधिकार्‍यांवर आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आर. पी. मराठे, तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन. एस. देशपांडे, माजी एमडी सुशील महुनोत आणि डीसके डेव्हलपर्सचे मुख्य अभियंते राजीव नेवासकर यांची चौकशी सध्या सुरू होती. प्रकल्पाला ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले त्या पैशाचा बँक अधिकार्‍यांशी संगनमताने अपहार करण्यात आला. बँकेचा पैसा शेवटी सार्वजनिक पैसा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे सर्व बँकांना लागू आहेत. सार्वजनिक संस्थांच्या पैशांचा उपयोग खाजगी पैसा असल्यासारखा करण्यात आला. या व्यवहारांमध्ये क ोणताही कायदेशीरपणा नाही. असा आरोप आहे की बँकेने अनेक अनियमितता माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे कर्जे मंजूर केली. कर्जे मंजूर करण्यापूर्वी कोणतीही काळजी घेतली नाही. कर्ज मंजूर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही. कर्जाचा वापर ज्या क ारणासाठी ते दिले होते त्याच कारणासाठी ते वापरले जात आहे की नाही हे तपासले नाही. एक कर्ज तर कॅश फ्लोचा तात्पुरता मेळ घालण्यासाठी या कारणासाठी मंजूर करण्यात आले