Breaking News

सर्वसामान्यांसाठी विविध योजना सुरु : थोरात


संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर तालुक्याने प्रतिकुलतेतून अनुकुलता निर्माण केली आहे. सर्वसामान्य व गोरगरिब यांच्या विकासासाठी आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीमार्फत विविध योजना सुरु आहेत, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केेले. 

तालुक्यातील मनोली येथे १७७ जातीचे दाखले व ४० रेशनकार्डचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्या बेबी थोरात, दूध संघाचे संचालक डॉ. चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बेंद्रे, मधुकर शिंदे, संतोष वर्पे, बाळासाहेब चव्हाण, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी मनोली गावातील नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.