Breaking News

रयतच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुरेश पाटील यांचा राजीनामा सदाभाऊ खोत यांना राजकीय धक्का

कोल्हापूर : रयतच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुरेश पाटील यांनी राजीनामा देत सदाभाऊ खोत यांना मोठा राजकीय धक्का दिला आहे. रयत क्रांती संघटनेपासून पाटील यांचा काडीमोड घेतला आहे. त्यांनी नव्या मराठा क्रांती संघटनेची स्थापना केली आहे. मंगळवारी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये या नव्या संघटनेची घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. राज्यातील 20 संघटना एकत्र येऊन नव्या संघटनेची स्थापना करणार येणार असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सुरेश पाटील यांच्याकडून नव्या संघटनेची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी 9 जुलै आणि 9 ऑगस्टला मराठा क्रांती संघटना आंदोलन करणार असल्याचा माहिती सुरेश पाटील यांनी दिली आहे. 9 ऑगस्टला क्रांती संघटनांकडून राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे रयत संस्थेला खिंडार पडलं असं म्हणायला हरकत नाही. सुरेश पाटील यांनी मांडलेली वेगळी चूल म्हणजे मंत्री सदाभाऊ खोत यांना प श्‍चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय धक्का मानला जात आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या 15 हून अधिक संघटना या क्रांती संघटनेमध्ये सहभागी झाल्या असून या संघटनेच्या कार्यकारिणीची घोषणाही आज क ोल्हापूरमध्ये करण्यात आली आहे.