Breaking News

कडोंमपाचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत निलंबीत


कल्याण : कल्याण डोंबीवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत अखेर यांना अखेर निलंबीत करण्यात आलंय. महापालिकेचा आयुक्त गोविंद बोडके यांनी आज घरतला निलंबित केलं. पोलीस संजय घरतला सत्र न्यायालयात हजर करणार आहेत. एखाद्या सरकारी कर्मचा-यास 48 तास पोलीस कोठडीत झाल्यास निलंबनाची कारवाई होते. मात्र, संजय घरत यांच्यावर कारवाईत दिरंगाई का करण्यात आली असा सवाल आता उपस्थित होत आहे. 13 जूनला एसीबीने घरतला अटक केली होती. घरत 8 लाखाची लाच घेत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आलं होतं.