पुणे : पीएमपीएमएल प्रशासनाला मिळणारा महसूल आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला महसूल यामध्ये कमालीची तफावत निर्माण झाली आहे, त्यामुळे आर्थिक डोलारा सावरताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचा आगामी काळात विपरीत परिणाम होउ नये यासाठी आता खुद्द कामगारांनीच पुढाकार घेतला आहे, त्याचाच एक भाग म्हणून प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी इंटक या कामगार संघटनेकडून प्रवाशांमध्ये या बससेवेच्या बद्दल जागर’ करण्यात येणार असून पीएमपीएमएलने प्रवास करण्याच्या संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. संबधित कामगारांचा गट तयार करुन त्यांच्यावर डेपोनिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे.पीएमपीएमएल ही बससेवा शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील लाखो प्रवाशांची लाईफलाईन’ समजली जात आहे, या बसच्या माध्यमातून दररोज कि मान बारा ते तेरा लाख प्रवासी प्रवास करत असतात. त्या माध्यमातून पीएमपीएमएल प्रशासनाला दररोज सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांचा महसूल मिळत असतो, त्यामुळेच ही सार्वजनिक वाहतूक संस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने तत्कालीन पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करुन पीएमपीएमएल’ ही स्वतंत्र कं पनीचा दर्जा असलेली संस्था अस्तित्वात आणली होती. मात्र; हा तोटा कमी होण्याच्या ऐवजी आणि ही सार्वजनिक वाहतूक संस्था सक्षम होण्याच्या ऐवजी या कंपनीत अधिकच विस्कळीतपणा येत चालला असून हा तोटा सद्यस्थितीत जवळपास चारशे ते साडेचारशे कोटी रुपयांच्या आसपास पोचला आहे.
पीएमपीएमएलच्या महसूलात कमालीची तफावत
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:15
Rating: 5