‘त्या’ 27 गावातील ग्रामस्थांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करा ! लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासने दिवास्वप्न ठरण्याची शक्यता
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत ती 27 गावे समाविष्ट करताना सर्वच लोकप्रतिनिधींनी अनके आश्वासने देऊन त्या ग्रामीण विभागातील नागरिकांचे स्वप्नरंजन केले. पालिकेत गेल्यावर जणू आपले गांव खरंच स्मार्ट सिटी होणार या आशेवर गेली तीन वर्षे तेथील गावकरी अवलंबून होते. पण प्रत्यक्षात साध्या जीवनावश्यक गरजा म्हणजे पाणी, रस्ते आणि आरोग्य यांची धूळधाण उडाली आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी कामेही आज होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमुळे खरोखर महापालिकेत जाऊन आम्ही घोडचूक केली अशी चर्चा खुलेआम सुरु आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना ग्रामस्थ समस्यांमुळे अर्वाच्य भाषेतून क ानउघडणी करतात यामुळे बाहेर फिरणेही आता त्यांना कठीण होत आहे. विकास कोणाचा करणार अनधिकृत बांधकाम करणार्या विकासकांचा कि पिढ्यान-पिढ्या वास्तव्य करणार्या त्या ग्रामस्थांचा असे प्रश्न विचारले जात आहेत.
डोंबिवली शहराच्या बाजूलाच असणार्या निवासी विभागसह पिसावली, गोळवली, सोनारपाडा, माणगाव, कोळेगाव, सागांव, नांदिवली, भोपर आदी त्या 27 गावांतील परिस्थिती भयानक आहे. रस्त्यांची परिस्थिती वाईट आहे. कचर्यामुळे दुर्गंधी फोफावली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सद्य परिस्थितीत पाण्याची समस्या सोडविण्यासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था करण्यात आली. परंतु पाणी योजना कोणासाठी टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत त्यांच्यासाठी कि पूर्वापार वास्तव्य करीत असलेल्या भूमिपुत्रांसाठी हा मोठा प्रश्न आहे. प्रशासकीय अधिकारी भ्रष्ट्राचाराला हातमिळवणी करून कामे करीत आहेत. पा लिका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधीना विश्वासात घेऊन कोणतीही कामे रीत नाहीत. स्वच्छता अभियानाचे ढिंडोरे पिटविले जात असले तरी खरी परिस्थिती अतिशय वाईट आहे. पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्या होत्या त्याचाच वापर आज केला जात आहे. कोणतीही नवीन रचना पालिका प्रशासनाने अद्याप केलेली नाही. 27 गावांसाठी 500 कर्मचारी असून ते इतरही आरोग्य विभागात काम करतात. महापालिकेत आम्ही आलो पण हाती काहीच लागले नाही ही मोठी खंत आहे. आता पा लिकेतून मोकळे केले तरच आमच्या समस्या निकाली निघतील अशी विचारधारा 27 गावात वाढत आहे.
