पुणे शहरातील रस्त्यावर राहणार्या आणि काम करणार्या सहा ते अठरा वयोगटातील मुलांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. त्यातील प्रत्येक मुलांवर पालिका प्रतिवर्षी 50 हजार खर्च करत आहे. पालिकेच्या समाज विकास विभाग आणि हैद्राबाद येथील रेनबो फाऊंडेशन यांनी गतवर्षी शहरातील रस्त्यावर राहणा-या कुटूंबातील मुले व भिक मागणा-या मुलांचा सर्व्हे केला होता. यामध्ये सुमारे 10 हजार 427 मुले रस्त्यावर राहत असल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली होती. यामध्ये 6 हजार 53 इतकी मुले तर 4 हजार 347 इतकी मुलींची संख्या असल्याचे आढळून आले. 6 ते 18 या वयोगटातील मुलांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. यामधील निम्याहून अधिक मुले शाळेत जात नसल्याने तसेच त्यांना लिहता वाचताही येत नसल्याचे या सव्छहे दिसून आले होते, या मुलांकडून रस्त्यावर रस्त्यावर अशा पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करून आपला उदरनिर्वाह करणा?्या मुलांसाठी महापालिका, शिक्षण विभाग तसेच रेनबो फाऊंडेशन आणि बजाज फिनसर्व कंपनी यांच्या मार्फत दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे . शहरात जवळपास वीस ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याचे काम सुरु आहे त्यासाठी महापालिकेच्या शाळांमधील रिकाम्या असलेल्या वर्ग खोल्या, बंद पडलेल्या शाळा उपलब्ध करून देण्यातआल्या आहेत. या प्रकल्पाच्या रेनबो या संस्थेशी करार क रण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर 1500 मुलांसाठी 9 कोटी 95 लाख देऊ केले आहे. यामध्ये प्रति मुलासाठी प्रतिवर्षी 50 हजार खर्च करण्यात आला आहे.
मुलांसाठी दिवस-रात्र निवारा प्रकल्प सुरु
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:30
Rating: 5