Breaking News

अंतिम परीक्षेपूर्वीच परिसर मुलाखतीमधून नोकरीसाठी निवड

प्रवरानगर दि. 31 मे - प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थांची अंतिम परीक्षेपूर्वीच परिसर मुलाखतीमधून नोकरीसाठी निवड झाली असुन आत्तापर्यंत महाविद्यालयाने 75 हून अधिक विद्यार्थांना परिसर मुलाखतींद्वारे नोकर्‍या उपलब्ध केल्या असल्याची माहिती प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे यांनी दिली.


प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात शिकणार्‍या इन्स्ट्रुमेंट अँड कंट्रोल इंजिनीरिंग विभागातील प्रितीश लबडे याचे नाशिक येथील इमर्सन एक्स्पोर्ट इंजिनीरिंग सेंटर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग विभागातील गौरव शिंदे याचे पुणे येथील कन्सोल निओवॅट पॉवर सोलुशन लिमिटेड, ह्याच इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग विभागातील रुपाली कोळसे, प्रीती जगताप व इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातील वाणी चैतन्य, थोरात रवींद्र यांचे औरंगाबाद येथील धूत ट्रान्समिशन या नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध परिसर मुलाखतींद्वारे अंतिम निकालापूर्वीच निवड झाली
यावर्षी आत्तापर्यंत महाविद्यालयाने 75 हून अधिक विद्यार्थांना परिसर मुलाखतींद्वारे नोकर्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याच बरोबर महाविद्यालयाचा अनेक नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार झालेले आहे ज्यामुळे अशाच अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्हस महाविद्यालयात होत असतात . ह्या सर्व विद्यार्थांनी या यशाचे श्रेय प्रवरा ग्रामीण अभियांत्रीकी महाविद्यालयाला दिले. वरील विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदार राधाकृष्ण विखे, ज़िल्हापरिषदेच्या अध्यक्षा ना. शालिनीताई विखे , मा. सुजयदादा विखे , प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था लोणीचे डॉ. एस. बी. निमसे, डायरेक्टर जनरल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.