Breaking News

मदतनिसाने पाठविला आरोग्य सेविकेला अश्‍लील व्हीडीओ

शिर्डी प्रतिनिधी / शिर्डी शहरातील एका नामांकित रुग्णालयातील मदतनिसाने परीचारीकेला अश्‍लील गाण्याचा व्हिडीओ पाठवण्याचा प्रकार मोफत उपचारासाठी व रुग्णांना दवा आणि दुवा असल्याने फरक पडत असलेल्या व वर्षाकाठी तीन लाख लोक उपचार घेणार्‍या दवाखान्यात घडला . त्या कामगाराला त्या महिलेने भाऊ हे तुम्हाला शोभते का? असा सवाल केला असता, त्यावर मी पाठवलेले मेसेज तुम्ही पाहत नाही म्हणुन हे तुम्हाला पाठवले असे प्रतिउत्तर व्हॉट्सअपवर दिले . महिलेने थोडा फार बोभाटा केला . त्याची कुणकुण महिला प्रमुख अधिकारी असलेल्या वरिष्ठांपर्यंत गेली . तक्रार नसल्याने कारवाई न झाल्याची चर्चा त्या दवाखान्यातील कामगारात सुरु आहे. 

अधिक माहिती अशी की मदतनीस म्हणुन हा कामगार रुग्णालयात काम करतो तर संबंधित महिला परीचारीका या पदावर काम करते. एकाच ठिकाणी काम करतात असे असतांना शांताबाई शांताबाई या गाण्यावर आधारीत दोन मिनिटांची अश्‍लील क्लिप असुन नृत्य करत असलेली तरुणी त्यात ठेका धरुन नाचतांना दिसुन येते. ही क्लिप पाहिल्यानंतर संबंधित महिलेला मोठा मनस्ताप झाला. तक्रार करण्याची इच्छा असतांना कुणीतरी मध्यस्थी केली . यानंतर 23 मे रोजी माफीनामा घेतला गेला. 25 मे ला वरीष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी केली. कठोर कारवाई करण्याऐवजी तक्रार नाही या कारणावरुन हे प्रकरण मिटवण्यात आले. कामावर आसतांना मोबाईल वापरु नका असा आदेश असतांना हे कामगार आदेशाला जुमानत नाही हेच या घटनेतुन पुढे आले आहे . काहीच कारवाई होत नसल्याने हा मदतनिस राजरोसपणे दवाखान्यात कामावर येऊन काही घाबरायचे नसते, चुक झाली काय होते. असा खुलासा करत फिरत आहे. काही सामाजिक महिला पुढे होऊन कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे समसते. या घटनेची शिर्डीत जोरदार चर्चा चालु आहे.