बाभळेश्वर येथे कृषिदूतांचे आगमन
कोल्हार प्रतिनिधी :
राहता तालुक्यातील बाभळेश्वर तेथे नेवासा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कृषि महाविद्यालय, भानसहिवरे येथील कृषिदुतांचे प्रशिक्षणासाठी आगमन झाले.
बाभळेश्वर येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमासाठी ते आले असून ग्रामस्थांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. याप्रसंगी सरपंच राजेंद्र म्हस्के, ग्रामसेवक तसेच इतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कृषीक्षेत्राशी संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल दरंदले, प्रा. मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ग्रामीण कृषि कार्यानुभवअंतर्गत शेतातील विविध समस्या व निरसन माती प्रशिक्षण व जल संवर्धनचे महत्त्व बीज प्रक्रिया व विविध नवीन शेती विषयक संकल्पना यावर शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. गोविंद वाघमारे, आशिष थोरात, सौरभ जाधव, निखिल सोनावणे, राजेश कुसळकर, आकाश थोरात आदी कृषिदूत उपस्थित होते.
