Breaking News

‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये १४ लोकांना अटक


शिर्डी / प्रतिनिधी
पोलिसांनी बुधवारी {दि.२७} मध्यरात्री जिल्हा पोलीस प्रमुखाच्या आदेशानुसार हाती घेतलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये शहरातील ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये कालिकानगर व हॉटेल लोजिंग वाहनांची तपासणी केली. १४ जणांना अटक केली. यासाठी डी. वाय. एस. पी. सागर पाटील यांनी पो. नि. अरविंद माने यांच्यासह काही अधिकारी १०० पोलीस व एस. आर. पी. ची मदत घेण्यात आली. 

कालिकानगर परिसर हा शिर्डीतील अत्यंत संवेदनाक्षम परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर परराज्यातील भाडेकरू राहतात. सूचना देऊनही घरमालक हे भाडेकरूंची नावे शिर्डी पोलिसांना देत नाही. त्यामुळे ५९ भाडेकरूंची व इमारतीत राहणाऱ्यांची ही चौकशी करण्यात आली. नाका बंदी करून १२५ वाहनांची तपासणी करण्यात आली. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या ८ तरुणांवर कारवाई करण्यात आली तर ८६ हॉटेल आणि लॉजिंगची तपासणी करण्यात आली.

पोलिसांनी अशी कारवाई सुरु केल्यामुळे लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कारवाईत पोलीस अधिकारी संदीप दहिफळे, जगदीश मुलगिर, शहाजी नरसुडे, प्रवीण पाटील, संदीप कहाळे, प्रवीण लोखंडे, बाळकृष्ण कदम, शहाजी आढाव यांनी भाग घेतला.