ईदच्या दिवशीही पाककडून शस्त्रसंधी राजौरी सेक्टरमध्ये गोळीबारात एक जवान शहीद
जम्मू काश्मीर : देशभरात ईदचा उत्साह असताना काश्मीर मात्र अशांत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. जोरदार गोळीबार आणि क ाही ठिकाणी दगडफेकही करण्यात आली आहे. राजौरी सेक्टरमध्ये गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. आज सगळीकडे ईद साजरी होत असतानाही पाकि स्तानची कारस्थान काही थांबत नाही आहे. एका वरिष्ठ लष्करी अधिका-याच्या सांग्यानुसार, शनिवारी पाकिस्तानकडून सीमा रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला, जो अद्याप सुरू आहे. या गोळीबारात बिकास गुरूंग नावाचा एक जवान शहीद झाला आहे. भारतीय लष्करीही पाकिस्तानला प्रतिउत्तर देण्यासाठी सज्ज झालं आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तानशी संबंधीत तणावाचा परिणाम अटारी-वाघा सीमेवर दिसला. कारण बीएसएफ आणि पाक रेंजर्स यांनी या वर्षी ईदवर एकमेकांना मिठाई देखील वाटलेली नाही. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये बीएसएफने संशयास्पद परिस्थितीत दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. ईदच्या दिवशी या पाकिस्तानी नागरिकांना काश्मिरमध्ये प्रवेश कसा मिळाला याबद्दल आता बीएसएफकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रत्यक्ष ताबा रेषेवरून 35 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. दहशतवादी काश्मीरमध्ये विविध भागात गटागटातून घुसण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना लागल्याचे सूत्रांकडून समजले आहे. गुप्तचर विभागाला चार वेगवेगळ्या गटात एलओसीवरून दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत. लष्कर ए तोयबाचे 18 दहशतवादी कुपवाडामध्ये घुसखोरी करू शकतात. हे दोन गटात घुसून सैन्य ठाण्यांना निशाणा बनवण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच नौगाम सेक्टर परिसरातही 8 जण घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. पुंछ सेक्टरमधून 6 दहशतवादी घुसखोरी करू शकतात.