वृक्षाची मैत्री करा, मानवी जीवन होईल सुखी ः शिंदे
टाकळी ढोकेश्वर / वार्ताहर
नैसर्गिक जंगले कमी होऊन, सिमेंटच्या जंगलाचे प्रमाण वाढल्यामुळे पर्जन्यमानात घट झाली. मानवी आरोग्य धोक्यात आले, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावून त्यांचे संगोपन करून, त्यांच्याशी मैत्री केली तरच, मानवी जीवन सुखी होईल असे प्रतिपादन कान्हुर पठार वनविभागाच्या वनरक्षक निर्मला शिंदे यांनी केले.
सावरगाव (ता. पारनेर) येथील जय हनुमान विद्यालयात पुणे येथील युवा उद्योजक व चिकणे झाप सावरगावचे सुपुत्र निलेश चिकणे यांनी स्वखर्चातुन शालेय विध्यार्थाना मोफत वह्या वाटप व वृक्षारोपणासाठी झाडांचे वाटप शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन पत्रकार संजय मोरे, माजी सरपंच पोपट चिकणे ह.भ.प माने महाराज, पारनेर तालुका बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतर, गुरव समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष रणधीर शिंदे, वनविभागाचे दादाराम तिकोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या की, मानवाने निसर्ग जंगलावर अतिक्रमण केल्याने जंगली प्राणी गावात आले. आपल्या भावी पिढीचा काळ सुखकर होण्यासाठी, जंगलाचे संगोपण करणे गरजेचे आहे. पारनेर वनविभागाच्या आधिकारी श्रीमती भिंगे यांच्या सहकार्यांनी सावरगावला वृक्ष रोपणासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पत्रकार संजय मोरे यावेळी बोलताना म्हणाले की, वन संगोपण हे राष्ट्रीय काम आहे. यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. निलेश चिकणे यांच्या माध्यमातुन शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी माने महाराज, पोपट चिकणे, बबन सुनसुळे, प्रमोद गुगळे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश थोरात, शेखर गुगळे, तुषार येवले, गणेश जेडगुले, बाळु शेळके, संग्राम शिंदे, राकेश शेलार, अशोक साळवे, विलास शिरतर, बाळु चिकणे, विकास शिंदे, बाळु शिंदे, अमोल साळवे, अक्षय चिकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष दाते यांनी तर, आभार निलेश चिकणे यांनी मानले.
