Breaking News

जामखेड शहराची ट्राफिक गंभीर समस्या


जामखेड / शहर प्रतिनिधी
जामखेड शहरात अनेक समस्या आहेत, नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी यावर पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजनांवर काम करत आहेत. मात्र शहरातील वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या आहे. याबाबत तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय अधिकारी व राजकीय पक्षांचे सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व्यापारी यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली. 
यावेळी अनेक व्यापारी पदाधिकारी यांनी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उपाययोजना सूचविल्या. अनेक पदाधिकारी व व्यापार्‍यांनी सांगितले की, शासकीय गेस्ट हाऊसपासून बीड रोड कॉर्नरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस असणार्‍या दूकानांसमोर बाकडे खुर्च्या व इतर दूकानाबाहेरील माल ठेवण्यास मनाई करावी अन्यथा सरळ 149 नुसार कारवाई करावी, रस्त्यावर बेशिस्त उभा केलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करावी, अनेकांनी शासकीय दूध डेअरी, बीडरोड कार्नरपर्यंत बुजलेली गटार तात्काळ खुली करावी, प्रशासनाकडे पैसे नसतील तर नागरीक व्यापारी सामुहिकपणे खर्च देण्यास तयार आहेत. शहरातील मुख्य नगर रोड, बीडरोड, खर्डा रोडवर पडलेले मोठ-मोठे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ भरावे, रोडची डागडुजी करावी असे अनेकांनी आधिकार्‍यांना खडसावले. नगरपरिषद प्रशासनाने सायं. 5 वा आपली गाडी फिरवून शहरातील रस्त्यांवरील नियंत्रक रेषांच्यावरील अतिक्रमण दूकानदारांनी स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा कारवाई करून जप्त केले जाईल असे सांगण्यात आलेे.
शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानांसमोर बेकायदेशीर वाहनांची पार्किंग केल्यास एखादा अपघात घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे या घटनेला आपणास जबाबदार धरुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी 149 प्रमाणे पोलीस प्रशासनाने दुकानदरांना नोटीसाही काही दिवसापूर्वी दिल्या होत्या. मात्र दूकानदारांनी काही प्रतिसाद दिला नाही. पोलिस प्रशासनाने शहरातील बेकायदेशीर होत असलेल्या पार्किंगला पर्याय म्हणून, शहरातील मुख्य रस्त्यावरील तसेच ही वाहने खर्डा रोडवरील विश्रामगृह, बीड रोडवरील ग्रामीण रुग्णालयात व कृषी उत्पन्न बाजार समिती मेन रोड येथील एच.यु गुगळे दुकानाजवळ तपनेश्‍वर रोड वरील वाहने खरेदी विक्री संघाच्या गोडाऊन जवळ नाममात्र शुल्क घेऊन लावण्यात याव्यात अशा सूचनादेखील पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत. त्यावर लवकरच शुल्काबाबत आधिकार्‍यांची बैठक होणार आहे