Breaking News

शेअर बाजार तेजीत; सेंन्सेक्स, निफ्टीची ऊसळी

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील बदलाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. दिवसाच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सने उसळी घेतली असून, सेन्सेक्स 35,644.05 अंकावर पोहोचला आहे. कालच्या 35,547.33 अंकात आज जवळपास 100 अंकाची वाढ झाली. सेन्सेक्स पाठोपाठ निप्टीही तेजीत आहे. कालच्या 10,772.05 अंकामध्ये 26.75 अकांची वाढ होऊन निप्टी 10,798.80 अंकावर पोहोचली. निफ्टीत 0.24 टक्के वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावर झाल्याचे सांगण्यात येत आहे.