वांद्र्यात दुहेरी हत्याकांड; दरोड्याच्या उद्देशाने हत्येचा संशय
मुंबई - वांद्रे परिसरातील एका इमारतीमध्ये 2 वृद्धांचा मृतदेह आढळला आहे. बुधवारी उशीरा रात्री उशिरा दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय असून, याचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वांद्रे पश्चिम येथील एकता डेलाइट नावाच्या इमारतीत 2 जेष्ठ नागरिकांचा मृतदेह आढळून आला आहे. नानक गोपालदास मखिजानी (85) आणि दया मखीजानी (80) अशी या दोघांची नाव आहेत. मखिजानी यांच्या घरी 15 दिवसांपूर्वी घरकाम करण्यासाठी मोलकरीण ठेवण्यात आली होती. मात्र, ही घटना घडल्यापासून मोलकरीण गायब आहे. बुधवारी रात्री उशिरा दरोड्याच्या उद्देशाने ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही व्यक्तींची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी कलम 302, 394, 397, 452, 459, 460, 381, 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.