Breaking News

योग विद्यापीठ स्थापन करण्याची प्रकाश जावडेकरांची घोषणा

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात योग दिन साजरा केला. या कार्यक्रमात 300 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी युजीसीच्या माध्यमातून योग विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा जावडेकरांनी केली. मुंबईतील 150 महाविद्यालयांसह पालघर, पनवेल आणि ठाण्यातील 30 महाविद्यालयातील सुमारे 600 हून अधिक विद्यार्थी कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि एनसीसी, एनएसएसकडून प्रमाणपत्र दिले जाणार जाणार आहे. विद्यार्थ्यांनी योगासोबत रोज नियमित व्यायामही केला पाहिजे. यामुळे शरीर सदृढ तर मनही चांगले राहते. योगामुळे मला खूप रिलॅक्स वाटते. देशातील प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकांनी रोज एक तास तरी योगा करावा, असे जावडेकर म्हणाले.