Breaking News

गणित विषयाची नेट-सेट कार्यशाळा उत्साहात


।संगमनेर/प्रतिनिधी।

येथील महाविद्यालयामध्ये गणित विषयावर नेट-सेट परीक्षेच्या तयारीसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेस विविध राज्यातील विद्यापीठातून ५५ विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सहभाग नोंदविला. गणित विषयातील विविध कल्पनांचे विवेचन असलेल्या तज्ज्ञ मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

या परीक्षांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार आहे. सदर कार्यशाळेस टि. सी. कॉलेज, बारामती येथील प्रा. सदाशिव पुराणिक, सिंहगड कॉलेज, पुणे येथील प्रा. वसंत करमड, जि. एम. डी. कॉलेज, सिन्नर येथील प्रा. गोकुळ गंधके, एम. एस. जी. कॉलेज, मालेगाव येथील प्रा. सूर्यभान सांगळे, प्रा. पाटील डी. आर व प्रा. अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळा ११ दिवस घेण्यात आली. गणित विषय विविध अध्यापन प्रणाली उदा. पीपीटी प्रेझेंटेशन, ऑनलाईन सराव परीक्षा, टुटोरीयल, सॉफ्टवेअर यांचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यात आला. अल्जेब्रा, अनॅलिसिस, लिनिअर अल्जेब्रा, आलाईर्ड मॅथेमॅटिक्स या नेट-सेट परीक्षांना अत्यंत उपयुक्त विषयांवरील कल्पना व गणित या कार्यशाळेत सोडविण्यावर भर देण्यात आला. सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी समन्वयक प्रा. पाटील डी. आर, थोरात, बी. के. कडलग मुळे यांनी परिश्रम घेतले.