Breaking News

सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पाणपोई सुरू, पादचार्‍यांसाठी जारचे थंड पाणी


नेवासा शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणपोईचे उदघाटन पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर काँग्रेसचे अध्यक्ष संजय सुखधान यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या पाणपोईसारख्या उपक्रमास लोकांनी पाठबळ दयावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी यावेळी बोलताना केले.

पाणपोईच्या उदघाटन प्रसंगी पाणपोई उपक्रमाचे संयोजक बबलू ईनामदार यांनी स्वागत केले. सिराज रंगरेज, बाळासाहेब सावंत, गुलाबभाई टेलर,सादब पठाण,गणेश आहेर,जहीर शेख,बिलाल घडीवाला यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आली असून या उपक्रमासाठी सर्वांनी खारीचा वाटा उचलून पाठबळ दयावे असे आवाहन केले. यावेळी सरपंच दादासाहेब कोकणे, माजी आ. शंकरराव गडाख स्वीयसहायक सुनील जाधव , बाळासाहेब डहाके, बबनराव सरकाळे, संभाजी ठाणगे, डेव्हीड राक्षे , भानुदास रेडे, भाऊसाहेब गंधारे, सागर पंडुरे ,रमेश जाधव,संजय चांदणे, नंदकुमार मांडण,सचिन सावंत,दिलीप जाधव,समीर जहागीरदार, रमेश शिंदे, विजय नवले, मोईम शेख, बबलू शेख,आसीफ पठाण,सोहेल बागवान फरहान बागवान उपस्थित होते.