Breaking News

प्रा.बेडसे यांना दिग्गजांचा पाठीबा,शिक्षकांना मिळणार हक्काचा प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघात होत असलेल्या निवडणूकीचा प्रचार अंतीम टप्यात पोहचला असून अखेरच्या फेरीत सर्वच उमेदवार विजयाचा दावा करीत असले तरी उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात इतकेच नाही तर शैक्षणिक क्षेञात सकारात्मक काम उभे केलेले सर्व राजकीय सामाजिक नेत्यांनी संदीप बेडसे यांना पाठींबा जाहीर केल्याने बेडसे यांचा विजय समीप मानला जात आहे प्रा.संदीप बेडसे शिक्षक लोकशाही आघाडी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप शिक्षकांच्या विविध संघटना , मुख्याध्यापक संघ अशा सर्व समावेशक विचारधारेचे एकमेव उमेदवार मानले जात असून जणता राजा म्हणून समाज मनात स्थान असलेले शरद पवार छगन भुजबळ अमरीश भाई पटेल,अशोक चव्हाण चंद्रकांत सुर्यवंशी बाळासाहेब थोरात राधाकृष्ण विखेपाटील एकनाथराव खडसे रोहीदास दाज़ी पाटील राजवर्धन कदम बांडे राजुबाबानचा अपूर्व हिरे यासारख्या दिग्गजांचा प्रा संदीप बेडसे यांना पाठींबा देऊन प्रचारात सक्रीय सहभाग नोंदविल्याने यंदा या निवडणूकीत इतिहास घडून बेडसे यांच्या माध्यमातून हक्काचा प्रतिनिधी विधीमंडळात पोहचण्याची ग्वाही दिली जात आहे.