Breaking News

अकोल्यातील विक्रेत्यांना तहसीलदारांनी दिली गुटखा न विकण्याची शपथ


31 मे या जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तहसीलदार यांच्या पुढाकाराने व अकोले पोलिस स्टेशन, तसेच अकोले तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्ममाने अकोलेतील गुटखा विक्री करणार्‍या टपरीधारक, किराणा दुकानदार यांना गुटखा विक्री न विकण्याची शपथ देण्यात आली. तसेच प्रत्येक दुकानात लावण्यासाठी येथे तंबाखू व गुटखा विक्री केली जात नाही. या स्टिकरचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना तहसीलदार मुकेश कांबळे म्हणाले की, शासनाने गुटखाबंदी केली कारण, देशात 15 लाख मृत्यू हे तंबाखू जन्य पदार्थांमुळे होतात. तेव्हा अकोल्यात गुटखाबंदीची अंमलबजावणी आपण प्रबोधन्याने करत आहोत. लहान मुलांना तर कोणताच तंबाखूजन्य पदार्थ देऊ नये. यानंतर तहसीलदार यांनी सर्वांना यापुढे गुटखा विकणार नाही व गुटखा बंदी यशस्वी करू अशी शपथ सर्वांना दिली. कार्यक्रमाचे स्वागत बाळासाहेब मालूजकर यांनी केले. हेरंब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रबोधन व कायदा यानेच कोणतीही बंदी यशस्वी होते. त्यामुळे या विषयावर प्रबोधन करण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्रात 2 कोटी 40 लाख लाख तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे यांनी गुटखाविक्री रोखण्यासाठी पोलीस प्रशासन यापुढे विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. विक्रेत्यांच्या वतीने अन्वर अहमद यांनी मनोगत व्यक्त करून, गुटखाबंदीला सर्व विक्रेते पूर्ण सहकार्य करतील असे आश्‍वासन दिले. पत्रकार बाळासाहेब मेहेत्रे यांनी आभार मानले. पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीनिवास रेणूकदास यांनी सूत्रसंचालन केले व कार्यक्रमागची भूमिका स्पष्ट केली. या वेळी , पत्रकार हेमंत आवारी,संजय शिंदे, नंदकुमार मंडलिक,रामलाल हासे, आबासाहेब मंडलिक, बाळासाहेब मालूंजकर,ग्राहक मंच चे.अध्यक्ष मछिंद्र मंडलिक, दत्ता शेणकर, व इतर मान्यवर उपस्थित होते.