महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि दशा
महाराष्ट्र ......दगड धोंड्यांचा देश.संत महापुरूषांची भुमी.दगडधोंड्यांसारखी राकट प्रवृती पण तितकेच मुलायम वर्तन.संत महापुरूषांच्या सहवासाचे सातत्य लाभल्याने विचारांची प्रगल्भताही तितकीच श्रीमंत.विविध धर्म,पंथ,जात आणि जातीतही नाना पोट भाग.प्रत्येकाची चाल,रूढी,संस्कृती ,परंपरा वेगळी तरीही परस्परांमध्ये कमालीचे सामंजस्य.म्हणूनच जगाच्या पाठीवर सर्वात पुढारलेले पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे.
या भुमीला स्वातंपुर्व काळापासून लाभलेला विचारांचा वारसा स्वांतञ्योत्तर काळातही बहरत गेला. या वैचारीक वारशातून सामाजिक आणि राजकीय चळवळ फोफावली.विशेषतः स्वातंञ्योत्तर काळात या चळवळीने अधिक जोर धरला.आधी सर्व वैचारीक प्रवाहांसमोर या भुमीला यवनांच्या कचाट्यातून सोडवणे हे एकमेव ध्येय होते.
तात्विक मतभेद असले तरी उद्देश एकच असल्याने ते प्रासंगिक रहात.स्वातंञोत्तर काळात माञ मुळ उद्दिष्टपुर्ती झालेली असल्याने वेगवेगळ्या मतप्रवाहांनी आपआपल्या वैचारिक बैठकीनुसार दिशा निश्चित के ली,तरीही काही काळ संयूक्त महाराष्ट्राच्या लढ्याने या वेगवेगळ्या प्रवाहांना एकञ ठेवण्याचे काम केले.एक मे 1960 नंतर माञ सामाजिक आणि राजकीय विचारांची बैठक बदलू लागली.उद्दीष्ट बदलले अन् दिशाही.
समाजकारण आणि राजकारण एकमेकांच्या हातात हात घालून काम करू लागले.तर कधी एकमेकांवर प्रभाव निर्माण करून कुरघोडीही सुरू झाली.तरीही या विचार प्रवाहातील मंडळींनी नैतिक मुल्यांची चाड बाळगण्याचे भान माञ सोडले नव्हते.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,वसंतराव नाईक,शंकरराव चव्हाण,पदमश्री विठ्ठलराव विखे,विठ्ठलराव गाडगीळ,धनंजय मेहता,भाऊसाहेब थोरात,भास्कर नाना दुर्वे ,पी.बी.कडू पाटील,का.दत्ता देशमुख ,बी.जे.खताळ पाटील,का.ए.बी.वर्धन,श्रीपाद अमृत डांगे,एस एम जोशी,मधु दंडवते,दिनकर पाटील,दादासाहेब गायकवाड,दादासाहेब रूपवते ,प्रबोधनकार ठाकरे मृणाल गोरे,बापुसाहेब काळदाते,काकासाहेब भापकर,प्रमिलाताई चव्हाणअशा सामाजिक आणि राजकीय विचारांमध्ये मतभेद असूनही वैचारीक प्रगल्भतेमुळे महाराष्ट्राच्या विकासात मतभेदांना स्थान दिले नाही.
यानंतरच्या पिढीत आजचे बुजूर्ग शरद पवार ,जयंत पाटील,स्व.बाळासाहेब विखे,स्व.विलासराव देशमुख,स्व.बाळासाहेब ठाकरे ,दादा पाटील शेळके यांनी आताआता पर्यंत तो वारसा अबाधीत ठेवला.अपवाद फक्त पुलोद आघाडीच्या प्रयोगाचा.
ऐंशीच्या दशकात शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांना शह देऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा पुलोद आघाडीचा प्रयोग अंमलात आणला.तेंव्हापासून महाराष्ट नव्हे तर देशाच्या राजकारणात आघाडीच्या राजकारणाची बीजे रूजली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
एक उमदा तरूण इच्छा शक्तीच्या जोरावर राजकारणात प्रस्थापीत असलेल्या ,सहकारात मुरलेल्या वसंत दादांसारख्या लोकनेत्याला मात देऊ शकतो तर त्यांच्या तुलनेत राजकारणात मुरब्बी असलेले,सहकाराचा वारसा लाभलेल्या अनेक मुत्सद्दी मंडळींची महत्वाकांक्षा जागी झाली आणि अहमदनगर जिल्ह्यातून थेट इंदिरा गांधींच्या एकहाती कारभाराला आव्हान देण्याचे धाडस तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी दाखविले.
इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये फुट पाडून दखलपाञ संख्या असलेले देशभरातील खासदार आपल्या बाजूला वळविण्यात बाळासाहेब विखें यांनी मसकाच्या प्रयोगातून दाखवून दिले होते.इतके सारे आगळे वेगळे घडूनही महाराष्ट्राच्या राजकारणाने एका वेगळ्या अर्थाने नैतिकतेची मुल्ये पायदळी तुडविल्याचे स्मरणात नाही.
या पिढीचे नवे वारसदार आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तर काही नैतीक मुल्य अवमुल्यामुळे स्वतः बाजूला झालेत.किंवा बाजुला फेकले गेलेत.
यशवंतराव चव्हाण यांचा वारसा त्यांचे मानसपूञ शरद पवार पंच्याहत्तरीतही तितक्याच उमेदीने चालवितांना दिसतात,अर्थात राजकारणाची बदलती गरज हेरून आवश्यक ते बदल क रण्याचे स्वातंञ्य शरद पवारांनी स्वतःकडे राखून ठेवल्याचे लपून रहात नाही हा भाग अलाहिदा.शंकरराव चव्हाण यांचे वारसदार अशोक चव्हाण,बाळासाहेब विंखेंचे वारस राधाकृष्ण विखे,भाऊसाहेब थोरातांचे वारस बाळासाहेब थोरात,शंकरराव काळेंचे वारस अशोकराव त्यानंतर आशिष,शंकरराव कोल्हेंचे वारस बिपीन व स्नेहलता कोल्ल्हे ,विलासराव देशमुखांचे वारस अमितराव,कडू घराण्यातील अरुण कडू ,वसंतदादांचा वारसा प्रतिक पाटील,यांच्यासह मोहीते,निंबाळकर,निलंगेकर,मुंडे,कोल्हे काळे अशा घराण्यांची नवी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहे.
या नव्या पिढीवर आपल्या पुर्वजांच्या विचारांचा प्रभाव आजही कायम असल्याचे दिसत असले तरी बदलत्या काळातील प्रदुषीत झालेल्या राजकारणात तो प्रभाव कुठे तरी प्रभावित होतांना दिसतो आहे,येणार्या काळासाठी महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा ठरू शकते.
या पिढीत पृथ्वीराज चव्हाण ,अजित पवार,सुप्रिया सुळे, सत्यजीत तांबे, राजवर्धन थोरात, डॉ.सुजय विखे, पंकजा, प्रीतम, धनंजय मुंडे, विश्वजीत कदम, राज ठाकरे, यांच्या सोबत महाराष्ट ्राच्या राजकारणावर नव्याने छाप पाडू पाहणारे घराण्यातील दोन्ही राजे यांच्यावर नवा महाराष्ट्र घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.
या नव्या जुन्या मंडळींकडे तरूण महाराष्ट्र मोठ्या आशेने पहातो आहे.या तरूण उर्जेला कुठल्या दिशेने न्यायचे याचे भान या मंडळींना ठेवावे लागणार आहे.त्यासाठी आज महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात सक्रीय असलेल्या जुन्या जाणत्या राजकारण्यांनी या वैचारीक संक्रमणाचे सारथ्य करणे काळाची गरज आहे.
एक गोष्ट या ठिकाणी मुद्दामहून नमूद करणे आवश्यक आहे.महाराष्ट्राला घडविण्यासाठी आणि या ठिकाणी आणण्यासाठी ज्या धुरीणांनी हयात खर्ची घातली ते एका विशिष्ट विचारसरणीने प्रेरीत होते.त्यांची विद्यमान पिढीही त्याच विचारांचा वारसा चालवित आहे.म्हणूनच महाराष्ट्राचे पुरोगामीत्व अद्याप अभेद्य आहे.भविष्यातील कित्येक वर्ष पुरोगामीत्व अभेद्यच राहणार आहे.
माञ त्यासाठी आजच्या वारस पिढीने तोल सांभाळने अधिक महत्वाचे ठरणार आहे.विशेष म्हणजे तत्कालीन धुरीणांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील महानुभवांचा सिंहाचा वाटा आहे.महाराष्ट्राच्या राजकारणासह समाजकारण,अर्थकारण,कृषी,कामगार अशा विविध क्षेञात आपली छाप पाडली आहे.तेंव्हापासून आजपर्यंत महाराष्ट अहमदनगर जिल्ह्याचा प्रभाव कायम आहे,म्हणूनच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विद्यमान पिढीवर मोठी जबाबदारी आहे.यासंदर्भात अधिक विश्लेषण पुढील वेळी.
- कुमार कडलग,नाशिक