पळवेत नवगतांचे स्वागत; दहावीच्या गुणवंतांचा सत्कार सभापती राहूल झावरे यांच्या हस्ते नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन
पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील श्री भैरवनाथ विद्यालयात नवोगतांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच नवीन बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये प्रवेश करून स्वागत करण्यात आले. तसेच दहावीच्या प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पारनेर तालुका पंचायत समितीचे सभापती राहूल झावरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. चे माजी सदस्य शिवाजी गाडिलकर होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सदाशिव शेळके, मुख्याध्यापक राजेंद्र गोरे, पळवेचे सरपंच नानाभाऊ गाडिलकर, हरिभाऊ भंडंलकर, रोहीदास नवले उपस्थित होते.
सभापती राहूल झावरे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील संस्था सुरू रहाव्या वाटत असतील तर, लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय शाळा समृद्ध होणार नाहीत. संस्थेने व माजी विद्यार्थी यांच्या सहभागातून इमारतीचे पहिल्या मजल्यावर गरजेच्या दोन नवीन खोल्यामध्ये प्रवेश करत सभापतींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मराठी माध्यमाची मुलेदेखील विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी बजावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पुढील प्रगतीसाठी वेळोवेळी मदत करण्याचे आवाहण यावेळी, राहुल झावरे यांनी केले. विद्यालय पळवे खुर्दच्या विद्यालयाचा इ. 10 वीचा निकाल 97.72 टक्के लागला. शाळेत प्रथम तीनही विद्यार्थीनी आल्याने सभापती झावरे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये प्रथम जाधव चैत्राली अनिल 83.80 टक्के, द्वितीय तांबोळी ऐशाद अल्लाबक्ष 81.40 टक्के, तसेच तृतीय कुटे गौरी संपत 80.20 टक्के गुण मिळवून यश संपादन केले, तसेच इयत्ता पाचवी ते दहावीतील नवीन विद्यार्थ्यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट जाधव यांनी तर, प्रास्ताविक व आभार मुख्याध्यापक राजेंद्र गोरे यांनी मानले.