Breaking News

डेब्रीज चौकशीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई साबांत पडझड सुरू अरविंद सुर्यवंशींचा बळी देऊन आपला माणूस नाना पवार - किशोर पाटील यांची वर्णी शक्य

मुंबई/ विशेष प्रतिनिधी
मंत्रालयातील डेब्रीज प्रकरणाने मंत्रालय हादरले असून दोषी कार्यकारी अभियंता रणजीत हांंडे यांना वाचविण्याच्या शकूनी प्रयत्नात होत असलेली पडझड सावरताना साबांतील शुक्राचार्यांच्या तोंडाला फेस आला आहे. दरम्यान डेब्रीज प्रकरणाचा खोटा अहवाल देण्यास मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी नकार दिल्याने त्यांची बदली क रून अधिक्षक अभियंता म्हणून नाना पवार अथवा बढतीवर किशोर पाटील यांची नेमणूक करून हे प्रकरण निकाली काढण्याची खेळी प्रस्तावित असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.दुसर्‍या बाजुला साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह हे वीस दिवसांच्या दौर्‍यावर जात असून त्यांचा तत्कालीन प्रभार आयएएस केडरकडे देण्याऐवजी साबां सचिव सी. पी. जोशींकडे देण्याचा घाट घालून डेब्रीजचे इप्सित साध्य करण्याची खेळी सुरू आहे. खास सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सरकारच्या पारदर्शक प्रतिष्ठेला कलंकीत करण्याचा प्रमाद करणारे शहर इलाखाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि नाशिक साबांचे विद्यमान अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांचे निलंबन अटळ असून प्रज्ञा वाळके यांचे पुर्नवसन क रण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.
फाजील आत्मविश्‍वासाने केलेला अतिरेक सर्वनाशाला कारणीभूत ठरतो, या निसर्ग तत्वाची प्रचिती सध्या मुंबई साबां प्रादेशिक विभागात येत असून मंत्रालय परिसरात शहर इलाखा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी केलेला डेब्रीज घोटाळा फडणवीस सरकारच्या पारदर्शकतेची कसोटी पाहणारा ठरला. नऊशे ट्रक डेब्रीज काढणे, सहाव्या मजल्यावरील केबीन क्रमांक 618 मध्ये नुतनीकरणावर 46 लाखांचा निधी खर्च झाल्याचे दाखवणे, मंत्रालयात एकाच दिवशी आठशे तीस मजूर आणणे या सार्‍या बाबी अतिशोयोक्तीची मर्यादा ओलांडणार्‍या ठरल्या मागील तीनही अधिवेशनात आ. चरणभाऊ वाघमारे आणि अन्य सहयोगी आमदारांनी या मुद्यावर सरकारला कोंडीत पक डले होते. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून चौकशी करण्याचे आदेश काढले होते. मुख्यमंंत्र्यांच्या कार्यालयाकडून या प्रकरणाच्या चौक शीची सातत्याने विचारणा होऊ लागल्याने प्रधान सचिवांकडून चौकशी अहवाल सादर करण्याचा रेटा लावला गेला.
15 मे रोजी चौकशी अधिकारी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले गेले होते. अद्याप चौकशी अहवालाचे घोंगडे साबांतील शुक्राचार्यांनी भिजत घातले असून रणजीत हांडे यांना वाचविण्यासाठी कालहरण सुरू आहे. मात्र या कालहरणात अरविंद सुर्यवंशी यांचा बळी जाण्याची शक्यता अधिक असल्याचे शुक्रवार शनिवार (दि. 1 व 2 मे) या दोन दिवसात घडलेल्या घडामोडीतून व्यक्त होत आहे.
रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी मोजमाप पुस्तिकेत केलेल्या नोंदींच्या अनुषंगाने अहवाल सादर व्हावा, अशी साबां प्रशासनातील शुक्राचार्यांची इच्छा आहे. तथापी ही इच्छा पुर्ण करण्यास अरविंद सुर्यवंशी यांनी सपशेल नकार दिल्याने मंडळींची गोची झाली आहे, यावर उपाय म्हणून अरविंद सुर्यवंशी यांची अधिक्षक अभियंता पदावरून उचलबांगडी क रीत तेथे आपल्या मर्जीतील अभियंता बसविण्याचा मार्ग काढला आहे. या आपला माणूस मध्ये नाना पवार आणि अधिक्षक अभियंता पदावर बढतीच्या प्रतिक्षेत असलेले कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांना संधी दिली जाणार असून त्यांच्या मार्फत डेब्रीज प्रकरणाचा अपेक्षित अहवाल तयार करून घेतला जाणार असल्याची खेळी खेळली जात आहे.
दरम्यान एका बाजुला अधिक्षक अभियंता आपला माणूस बसविल्यानंतर अडचण येऊ म्हणून प्रधान सचिव आशिषकुमार सिंहा हे वीस दिवस दौर्‍यावर जात असल्याने त्यांचा क ार्यभार आयएएस दर्जाच्या अधिकार्‍यांकडे देण्याऐवजी साबां सचिव सी. पी. जोशी यांच्याकडे देऊन हेतू साध्य करण्याचा डाव आहे तर दुसर्‍या बाजुला सरकारच्या पारदर्शकतेचे बाभाडे काढणार्‍या डेब्रीज प्रकरणातील मुख्य संशयीत सुत्रधार रणजीत हांडे यांना निलंबीत करण्याचा निर्णय दृष्टीपथात असून निलंबीत कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांचे पुर्नवसन करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे वृत्त आहे.
बॉक्सः
पाण्याची बाटली घेऊन हांडेंची धावपळ
डेब्रीज प्रकरणात आता क्षमा नाही हे वास्तव लक्षात आल्यानंतर रणजीत हांडे यांनी शनिवारी दिवसभर चंद्रकांत दादा पाटील यांचा पिच्छा पुरवला. दादा कोल्हापूरला जायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्सवर येईपर्यंत ते पाण्याची बाटली घेऊन धावपळ करीत होते. महालक्ष्मी एक्सप्रेसने सीएसटी सोडल्यानंतर पावले माघारी वळले.