Breaking News

पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू पाचही पर्यटक बोरवलीतील ; मृतांमध्ये दोन पुरुष आणि 3 महिलांचा समावेश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे समुद्रात 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आले. आरेवारे समुद्र किनारी पर्यटकांची रविवार असल्यामुळे मोठ्याप्रमाणात गर्दी होती. याच किनार्‍यावर बोरीवलीमधून एक ग्रुप आला होता. हे सगळे समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले यातील एका मुलीला स्थानिकांनी वाचवले तर 5 जणांचा यामध्ये बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तो अत्यंत खोल भाग आहे. त्यामुळे शोध मोहीम राबवण्यात अडचण आली. स्थानिकांनी पर्यटकांना या ठिकाणी पोहण्यास जाऊ नका असा सल्ला दिला होता. परंतु, त्याकडे या पर्यटकांनी दुर्लक्ष केले आणि ही घटना घडली. मृत सर्वजण बोरिवलीतील डिसुझा कुटुंबीय असल्याचे सांगण्यात येते. सहा जण पर्यटनासाठी येथे आले होते. त्यातील पाच जण समुद्रात पोहायला उतरले होते. बोरिवलीतील हे पर्यटक गणपती पुळे येथे जाणार होते. तत्पूर्वी आरेवारे येथील समुद्र किनार्‍यावर थांबले आणि त्यांनी पोहण्याचा आनंद घेण्याचे ठरवले. ज्यावेळी हे पर्यटक या समुद्र किनार्‍यावर पोहोण्यासाठी उतरले. त्यावेळी स्थानिकांनी हा भाग खूप खोल आहे, येथे उतरू नका, असा सल्ला दिला. पण या पाच पर्यटकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पाण्यात उतरताच खोलीचा अंदाज न आल्याने हे पाचही जण बुडाले. स्थानिकांनी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.
पर्यटनासाठी गेलेल्या बोरीवलीतील डिसुजा कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. सर्व जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. एकूण सहा जण आरेवारे समुद्र किनार्‍यावर फिरायला गेले असता पाण्यात गेले. पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सर्व जण पाण्यात वाहून गेले, मात्र यातील एक महिला बचावली. रेंचर डिसुजा (वय 19), मॅथ्यू डिसुजा (वय 18), केनेथ डिसुजा (वय 54), मोनिका डिसुजा (वय 44) आणि सनोमी डिसुजा (वय 22) अशी मृतांची नावं आहेत. तर रिटा डिसुजा यांना वाचवण्यात यश आले.