श्रीरामपूर शहरात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
श्रीरामपुर ता. प्रतिनिधी - धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने शहरातील श्रीराम चौक येथे सर्व पक्षीय, नेत्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. तसेच जयंतीनिमित्ताने रविवार दिनांक 3 जून 2018 रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी व धनगर समाज संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे निपाणी वडगांव येथे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच जयंती निमित्ताने निपाणीवडगांव फाटा येथील मल्हार सेनेच्या तरूण कार्यकर्त्यांनी शहरात मोटारसायकल रॅली काढुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व येळकोट येळकोट जय मल्हार चा नारा दिला. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे , नगरध्यक्षा अनुराधा आदिक, सभापती सचिन गुजर , युवानेते सिद्धार्थ मुरकुटे , तहसिलदार सुभाष दळवी , पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे , पञकार बोरसे मामा , नगरसेवक किरण लुणिया , मुक्तार शहा , राजेंद्र सोनवणे, राजेंद्र पानसरे, चंद्रकांत आगे, जयंत चौधरी , संजय यादव , अभिजित कुलकर्णी , विशाल आंभोरे , गणेश भिसे . विष्णू राऊत, संभाजी देवकर , बाळासाहेब राऊत अक्षय वर्पे, बापुसाहेब पवार, दिलिप भिसे , लहानु महाराज जाधव, योगेश राऊत, गणेश बिंगले , मंगेश शेळके , राहुल जाधव, सुरेश कोळेकर योगेश जाधव , मारुती बिंगले , उमेश धनवटे, शिवाजी बारगळ आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनगर समाज संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक दत्ताञय खेमनर , जिल्हा अध्यक्ष विठ्ठल राऊत , श्रीरामपुर तालुका अध्यक्ष चांगदेव नजन , राहुरी तालुका अध्यक्ष जालिंदर रोडे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रत्तिष्ठाणचे मनोज भिसे, बाबासाहेब राशिनकर, ठकसेन खंडागळे , नारायण भाकरे , जगन्नाथ मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.