बोधगया बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना जन्मठेप
पाटणा/वृत्तसंस्था : 2013 मधील बोधगया बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने इंडियन मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 4 वर्षे 10 महिने सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली. सर्व आरोपींना 25 मे रोजी दोषी ठरवण्यात आले होते. 7 जुलै 2013 ला महाबोधी मंदिर परिसरात बा ॅम्बस्फोट झाले होते. यात एक भक्त जखमी झाला होता. स्फोटामुळे मंदिरातील भाविकांची संख्या कमालीची घटली होती. या सीरियल बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड - हैदर अली (वय 30) असून तो स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेशीही जोडला गेला आहे. उमर सिद्दीकी, अझरुद्दीन कुरेशी, हैदर अली, मुजीबल्ला अंसारी आणि इम्तियाज अन्सारी हे या प्रकरणात आरोपी होते. हैदर, इम्तियाज आणि मुजीबल्ला हे रांचीचे रहिवासी असून, उमर आणि अझरुद्दीन रायपूर. छत्तीसगडचे रहिवासी आहेत. पाटणाच्या गांधी मैदान सीरियल बॉम्बस्फोटातही हैदर आरोपी आहे.