अग्रलेख भाजपचे वाचाळवीर !
भाजप केंद्रात आणि विविध राज्यात सत्तेत आल्यानंतर, भाजपच्या नेत्यांना आपण परमग्यानी झाल्याचा भास व्हायला असून, ते दिवसाढवळया आपल्या अकलेचे तारे तोडतांना दिसून येत आहे. याआघी महाभारतात इंटरनेटचा शोध असल्याचे दिवास्वप्न उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांने रंगवले होते. तो प्रकार होत नाही, तोच उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी सीतेचा जन्म हा टेस्टट्यूब असल्याचा दावा केला आहे. यामुळे भाजपचे मंत्री किती विदवत्ताप्रधान आहेत, हे सांगायला नको. आजच्या विज्ञानाची तुलना, तेव्हाच्या महाभारत, रामायणातील कपोलकल्पित बाबींशी करण्याची या मंत्र्यांना लहर येते. आणि आम्ही तेव्हा जगाच्या तुलनेत खुप पुढे होतो, असा दावा या मंत्र्यांच्या वक्तव्यातून दिसून येतो. भूतक ाळाची वर्तमानाशी तुलना करण्याऐवजी, आपण आज वर्तमानात देशासाठी काय योगदान देत आहोत? याचा विचार या नेत्यांनी करावी म्हणजेच त्यांना आपल्या अकलेची कीव आल्याशिवाय राहणार नाही. वास्तविक त्यांनी या कार्यक्रमात लाईव्ह टेलिकास्ट सारंख तंत्रज्ञान उपलब्ध होतं, म्हणूनच महाभारतातील युध्दाने वर्णन संजय आपल्या दृरदृष्टीने ध ृतराष्टाला सांगत असल्याचा अजब दावा केला. या वक्तव्याला आजतरी इतिहासात कोणताही आधार नाही. तसेच महाभारतातील ते तंत्रज्ञान कुठे गडप झाले? ते अद्यावत होत आजच्या पिढीपर्यंत का पोहचले नाही? या प्रश्नांवर मात्र या नेत्यांकडे कुठलेही उत्तर नाही. असे असतांना आपल्या अकलेचे तारे तोडण्यात या नेत्यांना काय हशील आहे?
आज ईलेक्ट्रॉनिक माडियाचं युग आहे, पण लाईव्ह करण्याचं तंत्रज्ञान हे आजच नाही तर त्या काळातही उपलब्ध होतं. रामायण काळात पुष्पक विमानांचा उल्लेख आढळतो. त्या क ाळात रामाने श्रीलंकेवरून अयोध्येपर्यंत प्रवास केला होता. सीतेचा जन्म हा टेस्ट ट्युब बेबीचाच प्रकार असल्याचे तारेही त्यांनी तोडले. या आधीच त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी महाभारत काळात इंटरनेट होतं असं वक्तव्य केलं होतं त्यावरून त्यांच्या विरूद्ध देशभर वादळ उठलं होतं. सोशल मीडियावरही नेटिझन्सनी त्याची खिल्ली उडवली होती.
आज आपण आपल्या देशांची तुलना इतर देशांतील तंत्रज्ञानाशी केली, तर आपण खूप मागे असल्याचे दिसून येत आहे. कारण आर्थिक संपन्नता ही प्रत्येक घरात पोहचली नाही. देशातील 10 टक्कांयाच्या हातात संपूर्ण देशांची संप्पती आणि सत्ता एकवटलेली आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय समानता कागदावरंच दिसून येत आहे. असे असतांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत देखील खूपच पाठीमागे आहेत. स्वनिर्मित तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे, आपण आजही शस्त्रासासह, अनेक अद्यावत प्रणाली इतर देशाकडून खरेदी करतो. ही स्वनिर्मित क्षमता विकसित करण्यासाठी आपल्याला अजूनही बराच वेळ लागणार आहे. कारण आजही आपल्याकडे कपोलकल्पित बाबी सांगणारे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श निर्माण करणार आहोत, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करावे म्हणजे, पुन्हा असे बेताल वक्तव्य भाजपाचे नेते करणार नाही. वास्तविक पाहता भाजपाच्या नेत्यांकडून असे बेताल वक्तव्ये होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे, संघाचे बौध्दिक. आज भाजपातील प्रत्येक नेता, कार्यकर्ता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जावून बौध्दिके घेत असतो. त्यामुळे या बौध्दिकांतूनच ही प्रेरणा भाजप नेत्यांना मिळत असावी. अन्यथा असे बेताल वक्तये करण्याचे धाडस या नेत्यांचे झाले नसते.