Breaking News

इंग्लंड दौऱ्यात विराटच्या सहभागावर प्रश्नचिन्ह ?

मुंबई
दुखापतीमुळे काऊंटी क्रिकेटवर पाणी सोडावं लागलेल्या विराटच्या इंग्लंड दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे. कोहलीने बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेटअकादमीत यो-यो फिटनेस टेस्ट दिली. बीसीसआयने भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला यो-यो टेस्ट देणं अनिवार्य केलं आहे. एकाबातमीनुसार कोहलीने आज महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, केदार जाधव या खेळाडूंसोबत यो-यो टेस्ट दिली. मात्र या टेस्टनंतर कोहलीचा निकालराखुन ठेवण्यात ठेवण्यात आल्यामुळे त्याच्या इंग्लंड दौऱ्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसू यांच्यासमोर प्रत्येक खेळाडूंनी फिटनेस टेस्ट दिली. यादरम्यान विराट कोहलीच्या खांद्याला आणि मानेला त्रास जाणवतअसल्याचं म्हटलं आहे. त्याच्या या दुखापतीबद्दल शंकर बसूंनी आपला अहवाल तयार केला असल्याचं समजतंय. त्यामुळे कोहलीची दुखापत बरी न झाल्यासइंग्लंड दौऱ्यातून विराट कोहलीला माघार घ्यावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी अफगाणिस्तान कसोटीदरम्यान मोहम्मद शमी यो-यो फिटनेसटेस्टमध्ये नापास झाल्याने त्याला संघातून माघार घ्यावी लागली होती. तर संजू सॅमसनलाही भारत अ संघातून माघार घ्यावी लागली होती.