Breaking News

‘आत्मा मालिक’च्या विद्यार्थ्यांची निवड


कोपरगांव : ता. प्रतिनिधी
भारतीय क्रिडा प्राधिकरण व स्कूल स्पोर्टस् प्रमोशन फाऊंडेशन (एस.एस.पी.एफ.) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्कूल इंडिया कप’ (सिझन २) आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी दि. १ जुलै ७ जुलै दरम्यान मौलाना मोहमंद अली जवाहर विद्यापीठ, रामपूर (उत्तर प्रदेश) याठिकाणी राष्ट्रीय शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. 

यामध्ये ऋशिकेश शिंदे, तन्मय घोरपडे, ओम लाड, गजवर्धन वाघ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या शिबिरामध्ये बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल व अथेलेटिक्सच्या क्रिडाप्रकारासाठी देशभरातून ४ हजार ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. हे शिबिर सर्व सुविधांसहित संपूर्णपणे मोफत असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

या खेळाडूंना ‘आत्मा मालिक’ स्पोर्ट अकॅडमीचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक शशेंद्र त्रिपाठी यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आश्रमाच्यावतीने अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, प्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले.