श्रीसंतुकनाथ विद्यालयाचा 10वीचा निकाल 93%
अहमदनगर - जेऊर बायजाबाई येथील श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाचा गेल्या मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 92.78% लागला असल्याची माहिती विद्यालयाकडून देण्यात आली. श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालयातील 10 परीक्षेमध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी याप्रमाणे- येवले गौरी अशोक (93.80%, प्रथम), पवार श्रद्धा उचित (93.20%) व गोरे गायत्री सुनील (93.20%, दोघीही द्वितीय), ससे गायत्री संजय (89.60%, तृतीय). यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य गायकवाड, उपमुख्याध्यापिका श्रीमती पारधे, पर्यवेक्षक जरे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्व सेवकवृंदांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.