ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग
आक्टोबर 2018 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. थोड्याच कालावधीत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने त्यानुसार या गावातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागणार आहे.
कर्जत तालुक्यातील राशिन, जळगाव, नवसरवाडी, शिंदे, निंबोडी, तोरकडवाडी, सोनाळवाडी, शितपूर, बिटकेवाडी, खातगाव, काळेवाडी, लोणी मसदपूर, माही, कानगुडवाडी, आंबीजळगाव, जळकेवाडी, परीटवाडी, देशमुखवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे - सोमवार, 18 जून रोजी तहसीलदार यांनी गुगल मॅपवरचे नकाशे करून, प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे, 25 जून रोजी संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे. अनुसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण निश्चित करणे, 30 जून रोजी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देणे व सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करणे. 7 जुलै रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप रचनेवर आरक्षणाची सोडत करणे, 11 जुलै रोजी प्रभागाची रचना व आरक्षण प्रसिद्ध करण्यापुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राथमिक तपासणी करणे, 12 जुलै रोजी प्रस्तावाच्या दुरुस्त्या करून प्रभाग रचना, आरक्षणाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली मान्यता देणे, 13 जुलै रोजी प्रभाग रचनेला हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक आहे. 20 जुलै रोजी हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक, 21 जुलै रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करणे, 31 जुलै रोजी प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे, 6 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभाग रचना व आरक्षणाला अंतिम मान्यता देणे, 9 जुलै रोजी जिल्हाधिकार्यांनी केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देणे. असा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागरचना व आरक्षण कार्यक्रम आहे. पुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने त्यानुसार नियोजन आखण्यास नेतेमंडळींकडुन सुरुवात होणार आहे.राशिन ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.