ज्ञानेश्वर विद्यालयाचा 97.61 टक्के निकाल
पारनेर / प्रतिनिधी । ज्ञानेश्वर विद्यालय रुईछत्रपती (ता. पारनेर) चा निकाल 97.61 टक्के लागला आहे. यामध्ये प्रेम बाळासाहेब बारवकर 93.60 टक्के गुण मिळवून प्रथम, तर निकिता अविनाश दिवटे 86.20 टक्के मिळवून द्वितीय, तर सचिन दादाभाऊ बारवकर 83.40 टक्के गुण मिळवून तृतीय आला. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.