वीज वितरण कार्यालयात टेलिफोनची तोडफोड
कोपरगाव : शहरात शुक्रवारी रात्री वादळी वारयामुळे झाडाची फांदी पडून वीज प्रवाह खंडित होता. त्यावेळी सर्व कर्मचारी दुरुस्तीसाठी गेले होते. मात्र रात्री १० ते ११ च्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने कार्यालयाच्या टेलिफोनची {क्र. २२३०४९} तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी अतुल खंदारे यांनी फिर्याद दिली.
यासंदर्भात अभियंता जितेंद्र महाजन यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, सर्व कर्मचारी वीजदुरुस्ती करता गेलेले असतांना अज्ञात व्यक्तीने कार्यालयाच्या टेलिफोनची तोडफोड करू नुकसान केले. यापुढे अशा प्रकारचे नुकसान केल्यास शासकीय मालमत्तेच्या नुकसानीचे गुन्हे दाखल करुन अत्यंत कठोर कारवाई करण्यात येइल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सदर कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसल्यामुळे गुन्हेगाराचे फावत असल्याचे आढळून आले.
