Breaking News

‘कर्मवीर भाऊराव पाटील’चा उत्कृष्ठ निकाल.


आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन उच्चमाध्यमिक शालांत परीक्षा सन २०१७-१८ चा एचएससी निकाल हा उत्कृष्ठ लागला. मुलींनी यंदाही निकालात आघाडी कायम ठेवण्यात यश मिळविले.
कला विभागाच्या निकालात इ. १२ वी परीक्षेला बसलेल्या ११० विद्यार्थ्यांपैकी ९० चांगले गुण मिळून उत्तीर्ण झाले. शेकडा निकाल ८१. ८२% लागला. सागर बंडू भूतांबरे याने ७८ टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. अक्षय सुनिल खरात ७०.६१ टक्के, द्वितीय, सागर नामदेव सांगळे ६८ टक्के, तृतीय क्रंमाक मिळविला. वाणिज्य विभागात ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेकडा निकाल ९७.४६ टक्के लागला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यी, प्राध्यापक, प्राचार्य तांबे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब आंधळे यांचे पालकांनी तसेच प्रवरा संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे, शालिनी विखे, युवा नेते डॉ. सुजय विखे, स्कुल कमिटी अध्यक्ष अण्णासाहेब भोसले आदींनी कौतुक आणि अभिनंदन केले.