‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने’ला प्रतिसाद
संगमनेर : भारत सरकार व राज्य सरकारच्या सयुंक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरु करण्यात आली. या योजनेसाठी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड करण्यात आली. या योजने अंतर्गत विद्यालयात ६ विविध कोर्सेस घेण्यात आले. संगमनेर तालुक्यातील एकुन १०० विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रधानमंत्री कौशल विकास योजना प्रशिक्षण केंद्राच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेब, विश्वस्त आ.डॉ. सुधीरजी तांबे, विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख , कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम.ए. व्यंकटेश ,उपप्राचार्य प्रा. ए.के. मिश्रा यांनी अभिनंदन केले.
