अररिया - बिहारमध्ये रस्ते अपघाताची मोठी दुर्घटना समोर आली आहे. लग्न समारंभ आटोपून परतणारी वर्हाडाची कार तलावात कोसळून झालेल्या अपघातात 6 बालकांचा मृत्यू झाला. गाडीतील अन्य 10 प्रवाशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ताराबाडी पोलीस स्थानकाच्या क्षेत्रातील चिकनी गावाच्या परिसरात ही घटना घडली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ आटोपून वर्हाडी कारने परतत होते. त्यावेळी रस्त्यात असलेल्या मुलाला वाच विण्याचा प्रयत्नात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडक बसून गाडी तलावात कोसळली. स्कॉर्पिओतील 6 बालकांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्हाडाची कार तलावात कोसळून 6 बालकांचा मृत्यू
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:59
Rating: 5