Breaking News

चळवळीचे संकटमोचक म्हणून कोल्हेंचे काम : बागडे


कोपरगाव शहर प्रतिनिधी

निळवंडे धरणांतील पाणी सर्वांची संपत्ती आहे. त्यावर सर्वांचा हक्क आहे. याच भूमिकेतून कोपरगांव शहराला पिण्याचे पाणी हे शासन देणारच आहे. संजीवनी आपत्ती व्यवस्थापनपथकाद्वारे तरुणांची मानसिकता बदलून संकटात मदत करण्याची भूमिका कौतुकास्पद आहे. ही मोठी चळवळ आहे. त्याचे संकटमोचक म्हणून बिपीन कोल्हे हे काम करीत आहेत, असे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनी केले.

संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी {दि. २१} संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या कार्यस्थळावर विधानसभेचे सभापती बागडे यांच्या हस्ते आपत्ती निवारण पथकाचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री शंकरराव कोल्हे होते. प्रारंभी प्रशासकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती निवारण पथकाबाबत माहिती दिली. आ. स्नेहलता कोल्हे, कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे, कार्यकारी संचालक जीवाजीराव मोहिते आणि त्यांच्या सहका-यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रारंभी मच्छिंद्र टेके यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी व्यासपीठावर प. पू. रमेशगिरी महाराज, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, अभय शेळके, संजय सातभाई, दिलीप दारूणकर, शिवसेनेचे कैलास जाधव, योगेश बागुल, रविंद्र पाठक, कैलास खैरे सर्व आजी माजी नगरसेवक, संजीवनी कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सभापती बागडे यांचा सत्कार करण्यात आला. 

बिपीन कोल्हे हे त्यांचा वाढदिवस शाल, हार, तुरे गुच्छ न स्विकारता शालापयोगी साहित्य तसेच वृक्षारोपणांसाठी वृक्ष वाटप करून साजरा करतात. यावेळी सभापती बागडे यांच्या हस्ते मतदारसंघातील पाच शाळेतील होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वहया आणि वृक्षांचे वाटप करण्यात आले.

सभापती बागडे म्हणाले, माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे सहकार व पाण्यांच्या अभ्यासाचे तज्ञ आहेत. मतदारसंघासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. १९६६ पासून त्यांचा व माझा संबंध आहे. ग्रामीण भागातील युवक देश-विदेशात पुढे गेला पाहिजे, यासाठी त्यांनी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटची स्थापना केली. शेवटी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.